बोदवड प्रतिनिधी । येथील पंचायत समिती उपसभापती दिपाली राणे, सदस्य प्रतिभा टिकारे व किशोर गायकवाड यानी आपल्या पदाचे राजीनामे पंचायत समिती सभापती गणेश पाटील यांच्याकडे सादर केले आहेत.
आज जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती-उपसभापती आणि सदस्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने उपसभापती दिपाली राणे, सदस्य प्रतिभा टिकारे व किशोर गायकवाड यानी आपल्या पदाचे राजीनामे पंचायत समिती सभापती गणेश पाटील यांच्याकडे सादर केले आहेत. पंचायत समितीच्या सदस्यांनी शासनाकडे मागण्याचे निवेदन आम्ही दिलेले आहे यावर विचार करावा अन्यथा आमचे राजीनाने स्वीकार करावे, तसेच मागण्या मान्य न झाल्यास आपणही राजीनामा देणार असल्याचे पंचायत समिती सभापती गणेश पाटील यानी सांगीतले.