एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथिल रा. ति. कबरे विद्यालयाचा इयत्ता १० चा ९५. ७२% टक्के निकाल लागला असुन या वर्षी देखील विद्यार्थ्यानी परीक्षेत घव घववीत यश मिळवत मागील वर्षाची विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे.
या वर्षी प्राची गणेश मोराणकर व प्रणाली रवींद्र पाटील या विद्यार्थीनी शाळेत प्रथम आल्या असुन योगा योगाने त्यांना सारखेच ९६.४० टक्के गुण मिळाले आहेत. तर ९५. २० टक्के गुण मिळवून सरस्वती शरद महाजन ही विद्यार्थिनी द्वितिय क्रमांकाने पास झाली आहे . तसेच लावण्या नितिन बिर्ला ही विद्यार्थीनी तिसर्या क्रमांकाने पास झाली असुन तिला ९४. ६० टक्के गुण मिळाले आहे २१ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र काबरा, सचिव श्रीकांत काबरा व सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने यांनी अभिनंदन केले आहे.