Home Cities जळगाव इकरा थीम महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

इकरा थीम महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इक़रा शिक्षण संस्था संचालित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरून, जळगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर इक्बाल शाह उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने करण्यात आली, जे सैफुल्लाह काझी यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायमा शेख रऊफ यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात “तराने इक़रा” या देशभक्तीपर गीताने झाली, जे ईरम फातिमा यांनी सादर केले. त्यानंतर वारिस मनियार यांनी नात पेश केली. मिनाज खान यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. त्यानंतर सबा चौधरी यांनी प्रभावी भाषण केले. सैयद हुजैफा यांनी हमद पेश केली, तर आबिद खान यांनी आपल्या विचारांचे प्रभावी सादरीकरण केले. साहिल खान यांनी उत्तम काव्य सादर केले. डॉक्टर तनवीर खान यांनी एनएसएसच्या वतीने विद्यार्थ्यांना केक वितरित केला. डॉक्टर वकार शेख यांनीही आपले विचार मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चांद खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉक्टर इक्बाल शाह म्हणाले की, “आपल्या देशातील तरुणांनी जागृत होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण देशाचे भवितव्य त्यांच्या हाती आहे. तरुणांनी पुढे येऊन राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे, तरच देशाची प्रगती शक्य होईल.” कार्यक्रमाच्या शेवटी मौलाना मुजम्मिल काझी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर यूसुफ पटेल, डॉक्टर राजेश भामरे, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “बज्मे उर्दू अदब” संस्थेच्या अध्यक्ष आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound