मुंबई प्रतिनिधी । व्याजदर बदलाचे अधिकार असलेल्या पतधोरण आढावा समितीच्या मंगळवारपासून सुरू असलेल्या तीन दिवसांच्या बैठकीअंती भारतीय रिझर्व्ह बँके अर्थात आरबीआयने आज (दि.5) रेपोदर कायम ठेवत असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवर कायम राहिला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास हे रेपो दरात आणखी पाव टक्क्यांची कपात जाहीर करतील, अशी सार्वत्रिक अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. सलग पाच वेळा रेपो दरात कपात केल्यानंतर त्याला डिसेंबरमध्ये ब्रेक लागला आहे. त्यामुळे रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्क्यांवर काय राहिला आहे. आर्थिक वर्षांतील पाचवे द्विमासिक पतधोरण रिझव्र्ह बँक गुरुवारी जाहीर केले. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत पाच टक्क्यांच्याही खाली घरंगळलेला विकास दर आणि वाढलेल्या महागाई दराच्या पूर्वपीठिका पाहून रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर कपातीचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती.