अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील येथील ढेकु रोडवरील गट नंबर १७११/४ गायत्री नगर मधील अतिक्रमण त्वरित काढण्याबाबत वंचित बहुजन आघाडीने दिला इशारा.
अमळनेर मधील गायत्री नगर, ढेकू रोड वरील गट क्रमांक १७११/४ मधील अतिक्रमण काढण्याबाबत तेथील रहिवासी भगवान संभू केदार हे गेल्या दोन वर्षापासून लिखित व तोंडी स्वरूपात न पा प्रशासनास अनेकदा तक्रारी करूनही यावरती न पा प्रशासनाने अद्याप कारवाई केलेली नाही.सदर अतिक्रमण हे रस्त्याच्या बाजूला असल्याने धंदाई महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांना अडचणीचे ठरत आहे.त्यामुळे सदर अतिक्रमण काढावे म्हणून केदार यांनी अनेकदा लिखित स्वरूपात तक्रारी अर्ज दिले आहेत मात्र याकडे न पा प्रशासनातील अधिकारी वर्ग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने वंचित आघाडीच्या वतीने सोमवार १० जुलै २०२३ रोजी या अतिक्रमण नकाढणाऱ्या व त्याला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी नगरपालिकेच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदन द्वारे देण्यात आला. याउपर ही अतिक्रमावरती कारवाई न झाल्यास दिनांक 18 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शहरात मोर्चा काढण्यात येईल, याच्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार असाल,असाही इशारा देण्यात आला आहे.सदरचे निवेदन उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना देण्यात आले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे,शहर अध्यक्ष संदीप सैदाणें,दिनेश बिऱ्हाडे,अतुल केदार, पूनमचंद निकम,भगवान केदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.