संघ विचारधारेच्या लोकांना पदावरून हटवा : एनएसयुआयची मागणी

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यरत असणार्‍या संघ विचारधारेच्या  लोकांना तातडीने त्यांच्या पदांवरून हटवावे अशी मागणी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली. जिल्हा एनएसयुआयचा अहवाल पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांदा सुपुर्द केला असून यात ही मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे  या शनिवारी एक दिवशीय जळगाव दौर्‍यावरती आल्या असता जळगाव जिल्ह्याच्या संघटनात्मक आढावा बैठकीमध्ये जळगाव जिल्हा एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जळगाव जिल्हा एनएसयुआय संघटनेच्या कार्याचा अहवाल कार्याध्यक्ष त्यांच्याकडे सादर केला. 

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे कार्याध्यक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीत सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या पाच फ्रंटल विभागाच्या जिल्हाध्यक्षांची व्हीआयपी कक्षामध्ये बैठक घेतली. यात त्यांनी  आपापल्या संघटनांच्या कामकाजाचा अहवाल जाणून घेतला. 

त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्हा एन एस यु आय संघटनेच्या कामकाजाचे सादरीकरण झाल्यानंतर कार्याध्यक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी एन एस यु आय ने केलेल्या कामाच कौतुक केलं व भविष्यामध्ये अजून जास्तीत जास्त ताकतीने काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना कशी उभारता येईल यासाठी मार्गदर्शक सूचना देखील केली.

दरम्यान,जळगाव जिल्हा एनएसयुआय संघटनेच्या माध्यमातून कार्याध्यक्ष प्रणिती ताई शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली की, जळगाव सह महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांवरील संघ विचारधारेचे कुलगुरू व थेट नियुक्ती केलेले लोक यांना तात्काळ पदावरून हटवावे. यासाठी कार्याध्यक्ष म्हणून आपण राज्यपाल महोदयांनी कडे याबाबतची मागणी करावी अशी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली.  

महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांवरती संघाच्या लोकांची पकड झालेली आहे व विद्यापीठांमध्ये सर्रासपणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे.जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमधील नियुक्त्यांमधील भ्रष्टाचार तसेच आर्थिक भ्रष्टाचार याकडे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे लक्ष वेधले व विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या भोंगळ व भ्रष्टाचाराची सखोल माहिती दिली. तात्काळ विद्यापीठांमधील या भ्रष्टाचारी लोकांना पदावरून हटवावे यासाठी राज्यपाल महोदयांनी कडे काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण मागणी करावी अशी विनंती केली.

Protected Content