भागवत भंगाळे यांच्या घरातील तपासणी पूर्ण; पुन्हा पोलीस स्थानकात चौकशी

जळगाव, प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यात आज पहाटे ताब्यात घेण्यात आलेले व्यावसायिक भागवत भंगाळे यांच्या घरातील तपासणी पूर्ण केल्यानंतर त्यांना पथकाने पुन्हा जिल्हापेठ पोलीस स्थानकात चौकशीसाठी नेले आहे.

याबाबत वृत्त असे की, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. आज पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व अजून एकाला अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

यात व्यावसायिक भागवत भंगाळे यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुमारे तीन तास चौकशी झाल्यानंतर भागवत भंगाळे यांना त्यांच्या घरी नेण्यात आले. येथे पथकाने कसून चौकशी केली. येथे देखील सुमारे दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांना पुन्हा जिल्हापेठ पोलीस स्थानकात चौकशीसाठी नेले आहे.

Protected Content