जळगाव-राहूल शिरसाळे । शहरातील शास्त्री टॉवर ते चौबे शाळेपर्यंत अतिक्रमणामुळे लहान मोठ्या प्रमाणावर चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावर भुरट्या चोऱ्या वाढल्या आहे. अतिक्रमणामुळे वाहतकीस अडथळा निर्माण होत आहे, हे अतिक्रमण कायमस्वरूपी न काढल्यास महापालिकेसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदनातून केला आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील शास्त्री टावर ते चौबे शाळेपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर हातगाडीवर फळे, भाजीपाला विक्री करणारे तसेच नाश्त्याच्या गाड्या लावून अतिक्रमण सुरू आहे. यामुळे रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. यामुळे वाहनधारकांना पायी चालणे कठीण होत आहे. याचा फायदा घेत लहान मोठ्या चोऱ्या देखील होत आहे. सोमवार १४ नोव्हेंबरपासून सर्व शाळा सुरू होत आहे. त्यामुळे या रस्त्यांवर वर्दळ वाढणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने या रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात यावा. या रस्त्यावरील अतिक्रमण न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने जळगाव महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारात देण्यात आला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर उपाध्यक्ष भगवान सोनवणे, युवा महानगर उपाध्यक्ष नरेश शिंदे, किरण राजपूत, अमोल कोल्हे यांच्यासह आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/650671476525418