संत गजानन महाराजांचे स्मरण करत ना. आकाश फुंडकरांनी स्वीकारला कार्यभार

नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l नुकतेच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना.आकाशदादा फुंडकर यांनी संत शिरोमणी गजानन महाराज यांचे स्मरण करत आपल्या खात्याचा कार्यभार सांभाळला.

सध्या नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अद्याप खातेवाटप झाले नसले तरी मंत्री म्हणून ना. आकाश फुंडकरांना त्यांना त्यांचे दालन देण्यात आले आहे. त्यातच त्यांच्या कक्षावर त्यांच्या नावांच्या पाट्या देखील लावण्यात आले. आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव मतदार संघाचे आकाश फुंडकर यांना कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आल्यानंतर .आज त्यांनी दुपारी नागपूर येथिल आपल्या दालनात सुरुवात केली. यावेळेस त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला आपल्या दालनामध्ये स्वीकारत. आपल्या कामाला सुरुवात केली एकंदरीत नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आता खातेवाटप झालं नसले .तरी आमदार ते नामदार झालेले आपल्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसून आले…

Protected Content