संबंध सुधारण्याचा आधार फक्त धर्म असूच शकत नाही

काठमांडू वृत्तसंस्था । लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरीच्या भूभागावरून भारत आणि नेपाळमध्ये सीमा वाद निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील तणाव निवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी आता नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञावली यांनी म्हटले आहे. की भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा आधार हा धर्म असू शकत नाही

भारत आणि नेपाळमध्ये मोठ्या संख्येने हिंदू धर्मीय राहतात. दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध असण्यासाठी धर्माचा आधार होऊ शकत नाही. धर्माला देशांतर्गत बाबींसाठी आणि दुसऱ्या देशासोबत चांगले संबंध असावेत यासाठी वापर होता कामा नये. मात्र, दोन्ही देशातील सांस्कृतिक समानता हा दोन्ही देशांना एकत्र जोडणारा दुवा असल्याचे नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञावली यांनी ‘म्हटले. आहे

ज्ञावली यांनी सांगितले की, आयुर्वेद, योग, ज्योतिष आदी गोष्टी भारत आणि नेपाळसाठी समान आहेत. दोन्ही देशातील समान संस्कृतीमुळे लोकांमध्ये चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये चढ-उतार येत असतो. मात्र, यामुळे आमचे संबंध आणखी चांगले झाले असल्याचे ज्ञावली यांनी सांगितले. नेपाळच्या संविधानाबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, नेपाळच्या संविधानात काय असावे आणि काय नसावे हे नेपाळी जनता ठरवणार आहे नेपाळ धर्मनिरपेक्ष होईल का याचा निर्णय नेपाळची जनता घेईल, इतर कोणीही घेऊ शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सीमा वादामुळे इतरही गोष्टी थांबाव्यात अशी आमची इच्छा नाही. भारतासोबत आमचे अनेक मुद्यावर, गोष्टींवर चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील चांगल्या संबंधांना लक्षात घेऊन सीमा वादावर तोडगा काढवा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content