मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी देशमुखांच्या सुटकेच्या आदेशाची दहा दिवस अंमलबजावणी न करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, देशमुखांच्या सुटकेच्या आदेशाला देण्यात आलेल्या स्थगितीची मुदत आज संपणार होती. याप्रकरणी आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली. तेव्हा देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी २०२१ मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौखसी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता.