रिलायन्स जिओ फायबरची खास ऑफर ; महिन्याला ५० जीबी डेटा

Comprehensive List Of Reliance Jio Compatible Phones 1

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जिओ सुरुवातीपासूनच स्वस्त सेवा प्रदान करण्यासाठी ओळखला जातो. तथापि, ग्राहकांना नेमके काय हवे आहे हे लक्षात घेत रिलायन्स जिओ कंपनीने फाइबर वापरकर्त्यांसाठी खास ऑफर बाजारात आली आहे. ३५१ रुपये किंमतीची ही योजना जिओ फायबरने दिलेली सर्वात स्वस्त योजना आहे. या ३५१ मासिक प्लानमध्ये १० एमबीपीएसच्या वेगाने दरमहा ५० जीबी डेटा मिळणार आहे.

रिलायन्स जिओ फायबरची ही योजना ज्यांना जास्त डेटा आणि अल्ट्रा फास्ट स्पीडची आवश्यकता नसते अशा ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली गेली आहे. योजनेत मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या ३५१ मासिक प्लानमध्ये १० एमबीपीएसच्या वेगाने दरमहा ५० जीबी डेटा मिळणार आहे. एफयूपीची मर्यादा संपल्यानंतर, या योजनेत उपलब्ध 10 एमबीपीएसची इंटरनेट गती ही कमी होऊन ती १ एमबीपीएस इतकी होईल. योजनेची एक खास गोष्ट म्हणजे या प्लानअंतर्गत ग्राहकांना विनामूल्य अमर्यादित कॉलिंग मिळणार आहे. टेलिकॉम टॉकच्या एका अहवालानुसार, ही योजना सबस्क्राइब करणाऱ्या ग्राहकांना जिओ कनेक्शनसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की, कंपनी ग्राहकांकडून कोणतेही इन्स्टॉलेशन शुल्क आकारणार नाही किंवा त्याला वन-टाइम शुल्क भरावे लागणार नाही. आतापर्यंत ग्राहकाला रिलायन्स जिओच्या कनेक्शनसाठी २५०० रुपये द्यावे लागत होते. यात काही टक्के परतफेड देखील मिळत होती. परंतु ३५१ रुपयांच्या या नव्या योजनेत असे काहीही नाही.

Protected Content