आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

 

मुंबई वृत्तसंस्था । पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास सीबआयकडे देण्यात यावा या मागणीसाठी आज जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन केले होते. पण, आंदोलन सुरु होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी राम कदम आणि त्यांच्या समर्थकांना निवसास्थानाबाहेरूनच ताब्यात घेतले आहे.

पालघरमध्ये गेल्या एप्रिल महिन्यात दोन साधूंची जमावाने हत्या केली होती. मॉब लिंचिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी राम कदम पालघर येथे ‘जनआक्रोश यात्रा’ काढत होते. कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार होती. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करत ताब्यात घेण्यात आली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची, प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे.

Protected Content