जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत भरती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे! जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’अंतर्गत १७३ हून अधिक रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश युवक-युवतींना शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण देणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविणे हा आहे.

विद्यावेतन व पात्रता:

उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे –
१२ वी उत्तीर्ण: ₹६,०००/- प्रति महिना
आय.टी.आय. / डिप्लोमा: ₹८,०००/- प्रति महिना
पदवीधर / पदव्युत्तर: ₹१०,०००/- प्रति महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया:

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.cmykpy.mahaswayam.gov.in
2. INTERN LOGIN वर क्लिक करून SIGN UP करा.
3. लॉगिन केल्यानंतर Apply for Job या पर्यायावर क्लिक करा.
4. उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करा आणि संबंधित आस्थापनांशी संपर्क साधा.

महत्त्वाची माहिती: वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे
संपर्क : फोन: 0257-2959790
वेळ: सोमवार ते शुक्रवार (सकाळी 09.45 ते संध्याकाळी 06.15)
कार्यालय: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव
युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

Protected Content