नवी दिल्ली । देशात कोरोना चाचण्यांची संख्या वेगाने वाढविण्यात आली असून काल दिवभरात तब्बल नऊ लाख लोकांची कोविड-१९ संसर्गाची चाचणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.
केंद्र व देशातील राज्य सरकारांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढविले आहे. या अनुषंगाने गुरुवारी भारतात तब्बल ९ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
गुरुवारी चोवीस तासात ९,१८,४७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून हा नवीन विक्रम ठरला आहे. दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३.२६ कोटींवर पोहोचली आहे. तर, देशाचा करोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याचा दर घसरला असून तो ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत असल्याने पॉझिटिव्हीटीचा दर कमी झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याबरोबरच तत्काळ आयसोलेशन, परिणामकारक ट्रॅकिंग आणि वेळेत वैद्यकीय व्यवस्थान या गोष्टी एकाच वेळी होत असल्याने करोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी होत असल्याचे निरिक्षण आरोग्य मंत्रालयने नमूद केले आहे.