ओशन क्लासेस् येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहिर झाला असून धरणगावातील ओशन क्लासेस्‌मधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महापुरुषांचे चरित्र ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.

शहरातील ओशन क्लास येथे विद्यार्थ्यांचा महापुरुषांचे ग्रंथ लिहून उचित सन्मान करण्यात आला. नुकताच लागलेला बारावी बोर्डाच्या निकालाच्या ओशन क्लास धरणगाव येथील विद्यार्थ्यांनी बायोलॉजी या विषयात घवघवीत यश संपादन केले. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा क्लासचे संचालक सागर राजेंद्र गायकवाड सर यांच्याकडून ” वाचाल तर वाचाल ” या संदेशा प्रमाणे महापुरुषांचे चरित्र ग्रंथ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यश संपादन केलेले विद्यार्थी प्रियंका नाथा खिल्लारे ९५ गुण, प्रतीक्षा पाटील, योगिता पवार – ९४, कांचन महाजन,दिपश्री चौधरी – ९३,जागृती पावरा ९१, धनश्री भागवत, दर्शन भोसले ९०, तुषार न्हाळदे, वैभव पाटील ८९, श्वेता पाटील ८६, कासिम रजा खाटीक ८४, दिनेश चौधरी ८२, प्रियंका आल्हाट ८०, इत्यादी विद्यार्थ्यांना १०० पैकी गुण प्राप्त केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले आज आम्हाला अत्यंत आनंद होत आहे कि, आमचा सत्कार महापुरुषांचे जीवन चरित्र ग्रंथ देऊन आमच्या गायकवाड सरांनी केला. आमच्यासाठी ही अनोखी भेट आहे व आमच्या जीवनातला हा अविस्मरणीय क्षण आहे. हे ग्रंथ आमच्या जीवनात प्रेरणादायी ठरतील असे प्रतिपादन विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमात ११ वी च्या विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. सागर गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केले. पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेले मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही, असे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.

प्रिय विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ११ वी चे विद्यार्थी आदित्य राजपूत व आभार चेतना पाटील हिने केले.

 

Protected Content