मुंबई प्रतिनिधी । गुंतवणूकदार आणि उद्योजकांचे लक्ष लागलेले आरबीआयचे पतधोरण आज दुपारी जाहीर होणार आहे. महागाई आणि मंदीच्या जोरावर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयकडून सहाव्यांदा व्याजदर कपात केली जाणार आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पतधोरणाची उत्सुकता शेअर बाजाराला देखील असून सेन्सेक्सने शतकी झेप घेत सुरुवात केली. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६९ अंकांच्या तेजीसह ४० हजार ९२० अंकांवर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६ अंकांनी वधारून १२ हजार अंकांवर व्यवहार करत आहे. ‘आरबीआय’ आजच्या पतधोरणात पाव टक्क्याने व्याजदर कपात करेल, अशी शक्यता आहे. सध्या बँकच प्रमुख व्याजदर तसे झाल्यास तुमचा कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या सत्रात व्याजदरांशी संबंधित शेअर्सला मागणी दिसून आली. सेन्सेक्समधील १६ शेअर तेजीत आहेत. ज्यात रिलायन्स, झी एंटरमेंट, टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प, एल अँड टी, मारुती सुझुकी आदी शेअर वधारले. भारत एअरटेल, सन फार्मा, इन्फोसिस या शेअरमध्ये घसरण झाली.