महाभरती नव्हे आता भाजपात महागळती; १२ आमदारांसह एक खासदार बाहेर पडणार?

bjp

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात महाभरती सुरु झाली होती. परंतू राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच, भाजपात महागळती सुरु होणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार १२ आमदारांसह एक खासदार बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करुन विजयी झालेले सात आमदार संबंधित पक्षांच्या नेत्यांशी संपर्कात आहेत, तर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचा प्रभाव असलेले भाजपचे चार असंतुष्ट आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते. नागपूरचे अधिवेशन संपल्यानंतर ही महागळती सुरु होणार असल्याचे कळते. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून ‘महाभरती’अंतर्गत भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुमारे डझनभर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून करण्यात आला आहे. भाजपच्या या आमदारांमध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश असून आणखी चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे कळते.

Protected Content