आरबीआयने रद्द केली ३१ मार्चची ईदची सुटी; कारण आर्थिक गोंधळ टाळणे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ रोजी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सामान्यतः, ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. मात्र, आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आणि आर्थिक वर्ष संपण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

३१ मार्च हा दिवस वित्तीय वर्षाचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे सरकारी महसूल, देयके आणि आर्थिक सेटलमेंटशी संबंधित सर्व व्यवहार वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक असते. याच पार्श्वभूमीवर, हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेली बँक हॉलिडे रद्द करून बँका कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१ एप्रिल २०२५ रोजी (मंगळवार) मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बहुतांश केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहतील. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन यानुसार करावे. आरबीआयच्या या निर्णयामुळे ३१ मार्चला होणाऱ्या आर्थिक गोंधळाला आळा बसणार असून, सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहार सुकर होतील. नागरिक आणि व्यवसायिकांनी याची नोंद घेऊन आपल्या आर्थिक व्यवहारांचे योग्य नियोजन करावे.

Protected Content