रायगड वृत्तसंस्था । रायगड एमआयडीसीतील एका कंपनीत बॉलर टाकीचा भीषण स्फोट झाला असून या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झालाय. तसेच 16 कामगार गंभीर जखमी झाले तर अनेकांचे डोळे निकामी झाले आहे. स्फोट होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास हा सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये 18 कामगार जखमी झाले होते. 18 जखमी कामगारांपैकी आशिष येरुनकर आणि राकेश हळदे या दोन कामगारांचा नवी मुंबईतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पाच कामगार हे गंभीर जखमी आहेत. जखमींना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या स्फोटामुळे काही जखमी कामगारांचे डोळे गेल्याची माहिती आहे.
विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनिअरीग प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की यामुळे तब्बल 18 कामगार जखमी झाले. हा स्फोट का झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाल्याचा आरोप होत आहे.