जामनेर प्रतिनिधी । गेल्या दोन वर्षात आरोग्यसेवेसह विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले रवींद्र सूर्यवंशी यांना सेवक सेवाभावी संस्था, जळगावतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जळगाव येथील कांताई सभागृहात दि.26 रोजी महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2021 हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम सेवाभावी संस्था जळगाव यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी डॉ.अंकुश जी आगलावे प्रमुख पाहुणे, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, सिनेअभिनेत्री पुष्पा चौधरी, नगरसेविका शारदा चौधरी रावेर, डॉक्टर जया उभे पुणे, डॉक्टर वंदना वाघचौरे, माधुरी कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, चित्रलेखा मालपाणी व संस्थेचे अध्यक्ष विशाल शर्मा, सचिव रंजना शर्मा या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळातील रुग्णसेवा व कार्याची पावती म्हणून रवींद्र शिवदास सूर्यवंशी जामनेर महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रविंद्र सूर्यवंशी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, डॉक्टर पल्लवी राऊत, डॉक्टर मनोज तेली, डॉक्टर किरण पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथील सर्व कर्मचाऱ्यांकडून दीपक सूर्यवंशी, प्रदीप गायके, गोपाल गायके, व्ही. एच. माळी, गोपाल पाटील, अतुल पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.