कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल रविंद्र महाजन ‘उद्यान पंडित’ पुरस्काराने सन्मानित

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१७ ते २०१९ मध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जामनेर येथील प्रगतशिल शेतकरी रविंद्र माधवराव महाजन यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्यानपंडित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

धन्वंतरी सभागृह, शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरुळ नाशिक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी फुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम असे होते. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक,राजकीय स्तरावरुन सर्वत्र कौतुक होत आहेत.

रविंद्र माधवराव महाजन हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रगतशील शेतकरी असून त्यांच्याबद्दलची माहिती –

१) त्यांच्याकडे वहिताखाली क्षेत्र ३०.९२ हेक्टर आहेत.त्यामध्ये आंबा,डाळिंब, मोसंबी,पेरु,सिताफळ,फळझाडांची लागवड केलीली आहेत. भाजीपाला पिकामध्ये वांगी, कांदा, टोमॅटो, इत्यादी पिकांची लागवड करतात.

२) शेतामध्ये फळरोपवाटीका तयार केली असुन दर्जेदार रोपांची शेतकऱ्यांना विक्री करतात.त्यामुळे परीसरात प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहेत.

३) सेंद्रिय खत निर्मिती,गांडूळखत युनीट,शेडनेट, पाँलीहाऊस,आंतर मशागतीसाठी दोन मिनी ट्रँक्टर,ब्लोअर,पाँवर टिलर,पाँवर स्पेअर,ट्रँक्टरचलित पेरणी यंत्र,सोलर पंप इत्यादी.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी आपल्या शेतामध्ये केला आहे.

४) विद्युत भारनियमनावर पर्याय म्हणून त्यांनी उंच टेकड्यावर ५ लाख लिटर व ३.५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. त्याच्या वापर विज नसतांना देखील फळरोपवाटीका व फळबागेला पाणी देण्यासाठी केला जातो.

५) सामाजिक कर्तव्य म्हणून शेतकरी आत्महत्या रोखणे,शेतकऱ्याचे आत्मबळ वाढविणे,पर्यावरणाचा समतोल राखणे, सुक्ष्मसिंचनाचा वापर करुन पाण्याची बचत करुन जास्त क्षेत्र लागवडीखाली आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

६) रविंद्र माधवराव महाजन यांनी शेतकरी राजा विचार कर व बळीराजाचा बळी असे दोन नाटकाचे लिखान करुन त्याचे सादरीकरण करुन आत्महत्या रोखण्याकरीता विशेष प्रयत्न केले आहेत.

७) रविंद्र माधवराव महाजन यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासन, कृषी विभाग उद्यानपंडीत पुरस्कार प्रधान करुन त्यांचा यथोचित सन्मान झाला.

 

Protected Content