राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेर येथील खेळाडूंना यश

raver 2

 

रावेर प्रतिनिधी । क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्यावतीने १७/१९ वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धा दि.१४ ते १७ नोहेंबर दरम्यान यवतमाळ येथे घेण्यात आली. या स्पर्धेत रावेर येथील ११ खेळाडूंनी पदक पटकावले आहे.

१७ वर्ष आतील किरण मराठे (७३ किलो वजन गत २४४ किलो वजन उचलून सुवर्ण पदक), आकाश शिंदे (६७ किलो वजन गट ४ था) आणि सागर माळी (८१ किलो गट ४ था) या खेळाडूंनी विजेते पदक पटकावले आहे. तसेच १९ वर्ष आतील अभिषेक महाजन (५५ किलो गट २०८ किलो वजन उचलून सुवर्ण पदक) हर्षल मराठे (६१ किलो वजन गट ४ था) आदित्य महाजन (६७ किलो गट ४ था) दुर्गेश महाजन (७३ किलो गट २६४ किलो वजन उचलून रौप्य पदक) विष्णु भोई (८१ किलो ४ था) तेजस रणशिंग (८९ किलो गटात २१५ किलो वजन रौप्य पदक) तर अभिषेक महाजन व किरण मराठे यांची बिहार पाटणा व ओरिसा येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. तसेच नाशिक विभागाने सलग दुसऱ्यांदा मुलांच्या संघाने राज्यपातळीवर विजेतेपद पटकावले आहे.

सदरचे खेळाडू हे सरदार जी.जी हायस्कूल, मॉर्डन स्कूल, राजीव पाटील स्कूल, गरुड महाविद्यालय अश्या शाळेत शिक्षण घेतात व व्ही.एस नाईक महाविद्यालय जिमखाना येथे वेट लिफ्टीग प्रशिक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनखाली सराव करतात. त्यांच्या या यशाबद्दल सरदार जी.जी हायस्कूलचे चेरमन पी.जी.मुजुमदार, मुख्याध्यापक एस.जे.वाणी, उपमुख्याध्यापक एच.जे.तडवी, उपप्राचार्य जी. टी. पाटील, पर्यवेक्षक टी.बी. महाजन व ई.जे.महाजन, जे.के.पाटील, अजय महाजन, युवराज माळी, गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि.आर पाटील, व्हि.एस.नाईक महाविद्यालय चेअरमन हेमंत नाईक, प्राचार्य डॉ.पी.व्ही दलाल, क्रीडा शिक्षक उमेश पाटील तसेच, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Protected Content