रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महावितरण कंपनीतर्फे वीजचोरी विरोधात राज्यव्यापी मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, आज रावेर येथे ३० घरांवर वीज चोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली असून साहित्य जप्त करण्यात आले.
आज विज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ३० घरी वीज चोरी पकडून चोरीचे साहित्य जप्त केले. यापुढे विज चोरी प्रकरणी रोज कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. वीज वितरण कंपनीचे सावदा येथील कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे याच्या आदेशानुसार व येथील उपकार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहायक अभियंता दिलीप सुंदराणी व प्र तंत्रज्ञ बी.सी साळुंके यांनी ही कारवाई केली.
सोबत कलींदर तडवी, उत्तमगिर गोसावी, तुषार चौधरी, धनंजय पाटील, अमोल हिवरे, सतिष सांगळे, चेतन भारते, अरुण माळी, कल्पेश पाटील, समीर तडवी, नजरखान जाबिरखान, दीपक पाटील होते. या सर्व वीजचोरांना वीज चोरीचे बिल देण्यात येणार असून ते न भरल्यास त्यांच्यावर पोलीसात गुन्हे दाखल केले जातील व अशीच धडक मोहीम रोज केली जाईल असा इशारा श्री सुंदराणी यांनी दिला. वीज चोरी करणाऱ्यांना धडकीच भरलेली आहे.