वाढत्या तापमानामुळे आगी लागण्याच्या घटनात वाढ

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – शहरातील तालुका पोलिस स्टेशनमधील जप्त ट्रक्टरलगतच्या वाळलेल्या गवताला आग लागल्याची माहिती मिळताच जळगाव अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

जळगाव शहरात वाढत्या तापमानामुळे आगी लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास शहरातील खोटेनगर परिसरातील तालुका पोलीस ठाण्याजवळ अवैध वाळू वाहतुकीचे ट्रक्टर जप्त केलेले होते. जप्त केलेल्या ट्रॅक्टरच्या आजूबाजूला वाळलेले गवत मोठ्या प्रमाणावर असून त्या गवताला व बाजूलाच असलेल्या ट्रॅक्टरला आग लागली. याची माहिती परिसरातील नागरिकांनी लागलीच जळगाव अग्निशमन विभागास दूरध्वनीवर दिली. माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन बंब घेऊन घेऊन घटनास्थळी पोचले. तालुका पोलिस ठाण्याच्या आवरात वाळलेल्या गवतासह ट्रक्टरला लागलेली आग अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणली. यात अग्निशमन वाहन चालक देविदास सुरवाडे, फायरमन रोहिदास चौधरी, भगवान पाटील, दिलीप पवार आदि कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.

Protected Content