रावेर प्रतिनिधी । आगामी काळात येणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रावेर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिका-यांची बैठक घेण्यात आली असून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवणे, तसेच मागील निवडणूकीत ज्या मतदान केंद्रावर अडचणी निर्माण झाल्या असतील, त्याबाबत विवरे, खिर्डी, ऐनपुर सरदार जी.जी. हायस्कूल, रावेर येथील मतदान केंद्रावर अडचणी निर्माण झाल्याचे अधिकारी यांनी सांगितले. त्यानुसार या मतदान केंद्रावरील अडी-अडचणींबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत साकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच रावेर मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्राबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच भरारी पथकातील कर्मचारी नेमणूक करून कर्मचाऱ्यांचे नावे तात्काळ सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. याचबरोबर निवडणूकीच्या अनुषंगाने हद्दपार केसेस् बाबतचर्चा करण्यात आली. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, यावल तहसिलदार जितेंद्र कुवर, रावेर पोलिस स्टेशनचे पो.नि. रामदास वाकोडे, यावल पोलीस स्टेशनचे श्री परदेशी, निभोंरा पोलिस स्टेशनचे सहा पो.नी योगेश शिंदे, फैजपुर पोलीस स्टेशनचे सहा पो.नि प्रकाश वानखेडे, रावेर निवडणूक नायब तहसिलदार कविता देशमुख आदिसह इतर अधिकारी उपस्थित होते.