जळगाव/रावेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक येथून दुचाकीने घरी येणार्या रावेर तालुक्यातील दोन तरूणांना रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे.

नाशिक येथून दुचाकीने रावेरला जाणाऱ्या मित्रांचा बुधवारी रात्री जळगाव येथील जैन इरिगेशनजवळ अपघात झाला. त्यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. यश वासुदेव महाजन (वय २२, रा.रोकडा हनुमाननगर, रावेर) व सुमीत दिवाकर पाटील (वय २६, रा.पुनखेडा, ता.रावेर) अशी त्यांची नावे आहेत.
यश हा मंगळवारी म्हाडाची परीक्षा देण्यासाठी नाशिकला गेला होता. बुधवारी परीक्षा आटोपल्यावर तो व त्याचा पुनखेडा येथील रहिवासी मित्र सुमीत पाटील दुचाकीने नाशिक येथून रावेरला येण्यासाठी निघाले. जळगाव जवळील जैन इरिगेशनसमोर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात यशचा जागीच, तर सुमीतचा जळगाव येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यश महाजन याच्यावर रावेर येथे, तर सुमीत पाटील याच्यावर पुनखेडा येथे शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.