रावेर प्रतिनिधी । रावेर-तामसवाडीचा जूना रस्ता हा पुर्वीप्रमाणे तत्काळ सुरु करण्यात यावा, यासाठी आज दि. 14 ऑगस्ट रोजी येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शे मेहमुद मन्यार यांच्यातर्फे तसिलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले असून आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील रावेर-तामसवाडी रस्ता पुर्वीपासुन ग्रामीण मार्ग होता. येथील अंतर कमी असल्याने व जवळचा रस्ता आसल्याने येथे पुर्वीपासुन डबर (दगड)खदान आहे. तालुक्यात शासकीय बांधकामास व रस्त्यावर खडी मुरुम येथुनच जात असते. त्यापासुन शासनास रायल्टीच्या माध्यमातून फारमोठ्या प्रमाणात महसुलच्या रुपात वसुल मिळते. रावेर-तामसवाडी रस्ता खोदुन फार मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे झाल्याने सतत बंद असतो. यामुळे या गावाचा संपर्कच तुटलेला आहे. पर्यायी पाच किलोमीटर लांबच्या मार्गे ये-जा करावी लागते. त्यामुळे सर्व नागरिकांना शारीरिक मानसिक आर्थिक नुकसानास समोरे जावे लागत आहे. तसेच तामसवाडी येथे प्राचीन ओंकारेश्वर मंदिर तिर्थक्षेत्र आसल्याने अनेक गावचे वारकरी पायी दिंडीचा सुध्दा हाच जवळच्या मार्ग रस्ता बंद झाल्याने भाविकांच्या भावना दुखल्याने फार मोठ्या प्रमाणात नाराजीचे सूर उमटत आहेत. रावेर नगरपालिकाचे धनकचरा डेपोचा रस्ता कायम स्वरुपी पर्यायी रस्ता दिल्यास सर्वाना न्याय मिळेल, धनकचरा डेपोसाठी शासकीय मालकीची नगरपालिकास तत्कालीन तहसिलदार यांनी दिलेली आहे. यापुर्वी रस्त्याने वापरही होत होता. परंतु काही स्वार्थी लोकांच्या तक्रारीमुळे मुख्याधिकारी रावेर नगरपालिका यांनी तो रस्ता बंद केलेला आहे. तरी यावेळी निवेदनावर संदीप चौधरी, गोविंदा पाटील व रमा मानकर आदी लोक उपस्थितीत होते.