Home क्राईम तरूणाचा खून करणार्‍याला पोलिस कोठडी

तरूणाचा खून करणार्‍याला पोलिस कोठडी

0
34

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फक्त १३० रूपयांच्या उधारीवरून तरूणाचा खून करणार्‍याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तालुक्यातील ऐनपूर येथे अवघ्या १३० रूपयांच्या उधारीसाठी तरूणाचा गुप्तांग पिरगळून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात भीमसिंग पवार या तरूणाला प्राण गमवावे लागले आहे. या घटनेतील आरोपी पन्नालाल कोरकू यास अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पन्नालाल कोरकू याला रावेर न्यायालयात हजर केले. सोमवारपर्यंत त्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सदर गुन्ह्याचा तपास निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्‍वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी करत आहेत.


Protected Content

Play sound