रावेर, प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीच्या सभापतीपदी निंबोल येथील जितेंद्र पाटील तर उपसभापतीपदी रावेर येथील पी.के. महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
येथील पंचायत समितीचे सभापतीपद ठरल्याप्रमाणे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राला मिळणार असून उपसभापती रावेर विधानसभा क्षेत्राला मिळणार आहे. येथील शासकीय विश्राम गृहावर झालेल्या भाजपच्या तालुका कोअर कमेटीच्या बैठकीमध्ये ही नावे निश्चित करण्यात आली आहेत. बैठकीत माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी सभापती माधुरी नेमाडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस वासुदेव नरवाडे, महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, शिवाजीराव पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे यांच्यासह भाजपा पं.स. सदस्य उपस्थित होते.