जप्त केलेला २१ लाखांचा वाळू साठा तस्करांनी चोरला !

रावेर प्रतिनिधी । येथील महसूल विभागाने जप्त केलेला ५०० ब्रास इतका व तब्बल २१ लाख रूपये मूल्य असणारा वाळू साठा तस्करांनी चोरीस नेल्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, दि १० डिसेंबर रोजी तालुक्यातील निंभोरासीम येथे अवैध वाळूवर कारवाईसाठी महसूल पथक गेले होते. त्यावेळी गेलेल्या पथकाला दत्त मंदीरच्या मागच्या बाजूला एक अवैध वाळूचा साठा तर दूसरा बोहर्ड-निंभोरासिम शिव रस्तावर एक वाळूचा साठा असा एकूण ५०० ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करून पोलिस पाटील यांच्या ताब्यात दिला होता. यानंतर संबंधीत वाळू साठा तस्करांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासनाच्या ढिलाईमुळे शासनाला लाखो रूपयाचा चुना लागला आहे.दरम्यान जप्त केलेली वाळू उघड्यावर होती गोडाऊन मध्ये नव्हती त्यामुळे वाळु साठ्याचे संवरक्षन सुध्दा जिकरीचे होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्परर्य दाखवत लिलावाच्या कार्यवाहीला गती देणे अपेक्षित होती परंतु तस घडले नाही.

दरम्यान, शासकीय दरानुसार एक ब्रास वाळूचे दर ४ हजार २०० रुपये आहे. या प्रमाणे महसूल पथकाने जप्त केलेली ५०० ब्रास वाळू ही शासकीय दरा प्रमाणे २१ लाख रूपयांची असून जप्त केलेली वाळू लिलाव होण्या आधीच चोरीला गेली आहे.

महसूल पथकाने दि १० नोहेंबरला ५०० ब्रास उघड्यावर असलेला अवैध वाळूचा साठे जप्त केला.त्या नंतर जप्त केलेल्या वाळूची तात्काळ लिलाव करून विल्हेवाट लावत दंड वसूल करणे गरजेचे होते.परंतु महसूल प्रशासनाने ढिलाईपणा केला आणि जप्त केलेल्या वाळूचा लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे दि ४ डिसेंबर म्हणजे तब्बल २४ दिवसांनी पत्रव्यवहार करण्यात आला होता. आज ३० डिसेंबर रोजी जप्त केलेल्या वाळू साठ्याची रिअँलीटी चेक केले असता सर्व वाळू चोरी गेली आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने त्याचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Protected Content