रावेर शालीक महाजन । शासनाच्या आदेशावरुनच मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथे जाणारा ऑक्सिजन पुरवठा बंद केला आहे. तथापि, यामुळे कोरोना बाधीतांनी घाबरून जाण्याचे कारण नसून जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बर्हाणपुर येथे जाणारा ऑक्सीजन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भाते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की शासनाच्या आदेश आहे की राज्यच्या बाहेर ऑक्सिजन पुरवठा करू नये म्हणून मध्य प्रदेशच्या बर्हाणपुरमध्ये ऑक्सिजन पुरवठा बंद केला आहे. याआधी दररोज १६० ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा केला जात होता. त्यामुळे जिल्हात अडचण निर्माण होत होती.परंतु आता पूर्ण बंद केला आहे.
यामुळे ऑक्सिजन घेण्यास त्रास होणार्या कोरोना रुग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड उपलब्ध आहे. तसेच भुसावळ मध्ये देखिल इतर बेड उपलब्ध असल्याचे श्री राऊत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की बर्हाणपुरचे जिल्हाधिकारी प्रविण सिंग यांच्याशी देखिल माझे बोलणे झाले. त्यांना सांगितले की एवढे दिवस आम्ही ऑक्सिजन सिलेंडर दिले परंतु आता शासनाच्या आदेश आल्याने बंद करत असल्याचे त्यांना सांगितले. तसेच आपणास ऑक्सिजन फारच गरज असेल तर मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी आदेश आल्यास ऑक्सिजन पूर्वरत केला जाईल. त्यामुळे रावेर मुक्ताई नगर यावल भागातील कोरोना बाधीत रग्णानी मध्य प्रदेशच्या बर्हाणपुरमध्ये एडमिट करून घेतले जात नसेल तर घाबरून जाऊ नका जिल्हात पुरेसे बेड उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला सांगितले.
दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले या संदर्भात तालुकास्तरावर तहसिलदार व वैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेण्याचे मी सांगितले आहे.यामुळे जास्तीत-जास्त जनते पर्यंत याची माहिती व बेड उपलब्धते बद्दल सांगितले जाणार आहे.