रावेरच्या उपनगराध्यक्षपदी हमीदाबी पठाण यांची बिनविरोध निवड

रावेर प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी हमीदाबी अयुब पठाण यांची ऑनलाईन सभेमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली.

रावेर येथील उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी नगरपालिकेत सभेचे ऑनलाईन या प्रकारात आयोजन करण्यात आले. याच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे होत्या. या पदासाठी हमीदाबी पठाण यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी देवगुणे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

या निवडीप्रसंगी नगराध्यक्ष दारामोहमंद जाफर मोहम्मद, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, गटनेते आसिफ मोहम्मद, नगरसेवक शेख सादिक, प्रल्हाद महाजन, अ‍ॅड.सूरज चौधरी, जगदीश घेटे, प्रकाश अग्रवाल, संगीता वाणी, शारदा चौधरी, संगीता अग्रवाल, शेख नुसरत यास्मीन, रंजना गजरे आदी उपस्थित होते.

हमीदाबी पठाण यांची रावेरच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!