रावेर प्रतिनिधी । जमीनीच्या वादा वरुन सुनावणी सुरू असतांनाच दोन शेतकर्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना आज घडली आहे.
या बाबत वृत्त असे की रावेर तहसील कार्यलायत आज अकरा वाजेच्या सुमारास मनोहर पाटील ( भोपाळ) आणि मधुकर पाटील ( रा. गहूखेडा) यांयामध्ये जमीन नावावर लावण्यासाठी येथील निवासी नायब तहसीलदार सी. जी. पवार यांच्या कक्षात सुनावणी सुरु होती.त्यावेळी मधुकर पाटील मनोहर पाटील यांच्यात प्रथम शाब्दीक वाद झाला. त्या नंतर वादाचे रूपांतर फ्री-स्टाईल हाणामारीत झाले. ही हाणामारी बघण्यासाठी एकच गर्दी जमा झाली होती दरम्यान तात्काळ पोलिसांना बोलून त्यांना पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. या हाणामारीची परिसरात एकच चर्चा होती.