अवैध मोबाईल बायोडिझेल पंपावर कारवाई; दोघे अटकेत

रावेर प्रतिनिधी | ऍपे रिक्षामध्ये रॉकेल मिश्रीत अवैध बायोडिझेल विक्री करणार्‍या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून ३ लाख ६७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पोलीसांना शहरात बायोडिझेल मध्ये रॉकेल मिश्रीत करून अवैधरित्या रॉंकेल मिश्रीत अवैध साठा करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. याची खातरजमा करून बर्‍हाणपुर रोडवरील गोपी ट्रान्सपोर्ट अँण्ड तोल काटा समोर, तसेच फकीर वाडा भागात पाताळगंगा रोडवर गोडाऊनमध्ये कारवाई करण्यात आली. या ठिकाणी ऍपे रिक्षात तयार करण्यात आलेले अवैध डिझेल पंप जप्त करण्यात आले. या दोन्ही रिक्षांवर नावाजलेल्या कंपन्यांचे लोगो लावण्यात आले होते. यामुळे ग्राहकांची दिशाभूल करून डिझल विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचे पोलीस कारवाईत आढळून आले.

दरम्यान पोलिसांनी शे.शरीफ शे.मुस्लिम (वय ३८) आणि शे.फिरोज शे.मुस्लिम वय २७) दोन्ही रा. तिरुपती नगर , रावेर यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एकुण २७०५ लिटर रॉकेल मिश्रीत बायोडिझेल साहीत्य व साधनासह एकुण रुपये ३,६७,२६० रुपयाचे मालासह जप्त करण्यात आले. या दोन्ही जणांनी डिझेल विक्रीसाठी लढवलेली शक्कल पाहून पोलीस देखील चकीत झाले. या बाबत पुरवठा निरीक्षक रावेर तहसील वाकोजी नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केलेले आहे.

याबाबतसदरची कारवाई डी वाय एस पी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, ए पी आय शितलकुमार नाईक, पी एस आय मनोहर जाधव, पी एस आय मनोज वाघमारे,हे कॉ जावरे, पो ना नंदू महाजन,पो ना महेंद्र सुरवाडे,पोकॉ सचिन घुगे, ए एस आय राजेंद्र करोडपती, प्रदीप सपकाळे,पो कॉ प्रमोद पाटील,पो कॉ सुकेश तडवी,पो कॉ महेश मोगरे,हे कॉ भागवत धांडे, पो कॉ पुरुषोत्तम पाटील; सुरेश मेढे, विशाल पाटील,मंदार पाटील, कुणाल पाटील या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा तपास पो. नि.रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Protected Content