रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील मोरव्हाल येथील आदिवासी बांधवांना मोरव्हाल संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत एसटी लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले. यावेळी आदीवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वन व्यवस्थापन समिती मार्फत 88 एसटी लाभार्थ्यांना वनपाल संजय भदाने यांच्याहस्ते गॅस वाटप करण्यात आले. यावेळी वन समिती अध्यक्ष सलिम अरमान तडवी, वनरक्षक गणेश चौधरी देखिल उपस्थित होते. येथील समीर सलीम तडवी, जहांगीर कादर तडवी, शकीला मेहरबान तडवी, अमीन हमीद तडवी, हनिफा रोशन तडवी, शकिल हमीद तडवी, फत्तू नत्थू तडवी, सालेमान हैदर तडवी यांना योजनेतून गॅस वाटप करण्यात आली आहे.