गोडाऊनला आग; लाखोंची सामग्री जळून खाक

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अहिरवाडी येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडाऊनला रात्री उशीरा लागलेल्या भयंकर आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील अहिरवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडाऊन मध्ये ठेवलेले मंडप व इतर साहीत्यांना रात्री एकच्या सुमारास अचानक आग लागली. विकास सोसायटीच्या गोडाऊन मध्ये पाडळे येथील एका व्यक्तीने मंडप व इतर साहीत्य ठेवले होते.रात्री अचानक एकच्या सुमारास मोठी आग लागली. काही क्षणातच आगीचे लोळ उठल्याचे दिसून आले.

दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच संदीप सावळे यांनी गावकर्‍यांना उठवून आग विझवण्यासाठी प्रर्यत्न केले. परंतु आग जास्त असल्याने अखेर त्यांनी रावेर नगर पालिका व पोलिस स्टेशन याची माहिती दिली.अग्नीशामक दलाची गाडी अहीरवाडी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला तरी आग आटोक्यात येत नव्हती. सावदा येथून देखील अग्नीशामक दलाची गाडी येथे आली आणि सुमारे दोन तासा नंतर आग आटोक्यात आली.

आग विझवण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन नागेश्वर चौधरी तसेच बाळू महाजन, बंडू पाटील, विशाल चौधरी, सुशांत चौधरी, मनोज महाजन, अश्विन पाटील, किरण लासुरे, अशोक चौधरी, भगवान पाटील, कन्हैया चौधरी, मोहन महाजन, प्रशांत सावळे, शुभम वैद्य, डिगंबर राजपूत, गोकुळ चौधरी, जितू सावळे, विकास सावळे, रामभाऊ सावळे, मयुर सावळे, गणेश धनगर, नागेश्वर चौधरी, भागेश्वर चौधरी, सुनील महाजन, कन्हैया महाजन यांच्यासह इतरांनी मदत केली.

दरम्यान, या आगीत सुमारे २५ लाख रूपयांची सामग्री जळून खाक झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पहाटे उशीरापर्यंत याबाबत रावेर पोलीस स्थानकात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content