फैजपूर/रावेर प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार शिरीष चौधरी यांनी आज (दि.3) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
येथील रावेर शहरातील आठवडे बाजार येथे आधी कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी अनेक कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त मतदारसंघात रस्ते, बेरोजगारी, शैक्षणिक विषयासह अनेक मूलभूत समस्यांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याची टीका या मेळावा मध्ये करण्यात आली यावेळी मेळावा संपन्न होतात ढोल-ताश्याच्या गजरात वाजता-गाजत माजी आ. शिरीष चौधरी यांची उघड्या जीपवर बसवून भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी उमेदवारी अर्ज भरतांना माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदाररमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकेश येवले, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,यावल राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, रावेर राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष निळकंठ चौधरी, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समिती सभापती डी.सी.पाटील, माजी सभापती, राजीव राजिव पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, प्रा.मुकेश येवले, लेवा पंचायत युवा अध्यक्ष ललित पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, धनंजय चौधरी, पं.स.सदस्य योगेश पाटील, दिपक पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख महेमुद, नगरसेवक सादीक शेख, गोंडू महाजन, असदुल्ला खा, एम.ए.खान, किशोर पाटील,आर के चौधरी, गुलाब तडवी, हमीद तडवी, अर्जुन जाधव, प्रकाश मजुमदार, सजंय चौधरी यांच्यासह यावल, फैजपुर, रावेर येथील सर्व बूथ प्रमुख दोन्ही तालुक्यातील सर्व कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस, नगरसेवक सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह मोठ्या संखेने कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सदस्य महिला पुरुष उपस्थितीत होते.