खडसे समर्थकाचा रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

khadse e1550572684596

मुक्ताईनगर प्रतिनिधी । भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने रावेर भाजपा कार्यालयासमोर एका समर्थकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

भाजपाच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची दोन याद्या जाहीर केल्यात. या यादीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव नसल्यामुळे खडसे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत होता. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने खडसेंवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत समर्थकांनी योग्य निर्णय घेण्याची विनंती खडसेंना केली आहे. दरम्यान आज गुरुवारी खडसे यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते, समर्थक यांचा मेळावा सुरु आहे. दरम्यान मेळावा सुरु असताना भाजपच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रावेर येथील भाजप कार्यालयासमोर एका समर्थकाने स्वत:वर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधला. पक्ष बदनाम होईल असे कोणतीही कृती करू नका असे आवाहन खडसे यांनी केले आहे.

Protected Content