रावेर प्रतिनिधी । येथील नगरपालिकेमध्ये पंतप्रधान आवास योजने अंतर्गत रावेर नगरपालिकेतील लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष दारा मोहंमद म्हणाले की, रावेर शहरातील नगर पालिका हद्दीत प्रत्येक गरीब कुटुंबा घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल कोणाला यापासुन वंचित ठेवले जाणार नाही. ते पुढे म्हणाले की, शहरात पहील्या टप्यात २०० घरकुलांना मंजूरी मिळाली असुन त्यापैकी १५० घरे मंजूरी आहे त्यातील ८० घरांची ओटालेव्हर पूर्ण झाली असल्याने लाभार्थीना ४० हजार रूपयाचा चेक वाटप करण्यात आले तर दूसरा टप्पा केंद्र सरकारचा ६० हजार अजुन बाकी आहे या कार्यक्रमाला रावेर नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, उपनराध्यक्षा संगीताताई अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष अॅड. सूरज चौधरी, नगरसेवक यशवंत दलाल, गटनेता आसिफ भाई, नगरसेवक राजेंद्र महाजन नगरसेवक सादिक भाई नगरसेवक असद भाई, कलीम मेंबर, आयुब पठाण, ललित महाजन,मुन्ना अग्रवाल आदी उपस्थित होते.