फैजपूर प्रतिनिधी । येथील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये रावेर विधानसभा क्षेत्रातील सर्व डॉक्टरांच्या बैठकीचे आयोजन आ.हरिभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी आ.जावळे यांनी डॉक्टरांच्या समस्या जाणून घेत, त्या समस्यांवर लवकरच निराकारण करणार असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर विधानसभेतील डॉक्टरांच्या आयएम संघटनेच्या सभागृहासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आ. जावळे यांनी दिली. रावेर विधानसभेतील सर्व डॉक्टरांची बैठक शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता फैजपूर येथील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये घेण्यात आली. यावेळी ना. जावळे यांनी डॉक्टरांच्या समस्या जाणून घेत, त्या समस्यांवर निराकारण करणार असल्याचे सांगितले आहे. याचबरोबर, डॉ.कुंदन फेगडे यांच्या आश्रय फाउंडेशनच्या माध्यमातून यावल रावेर तालुक्यातील सर्व डॉक्टरांचे चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले आहे. या चर्चासत्रात राज्याचे कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आणि आ.जावळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी डॉक्टरांची संवाद साधला.
याप्रसंगी डॉ.दत्तप्रसाद दलाल, डॉ.अतुल सरोदे, डॉ.सूनील चौधरी, डॉ.एस.आर.कुलकर्णी, डॉ.नरेंद्र कोल्हे, डॉ.कुंदन फेगडे, डॉ.भरत महाजन, डॉ.जागृती फेगडे, डॉ.भाग्यश्री महाजन, डॉ.संगीता महाजन, डॉ.वृषाली पाटील, डॉ.एकता सरोदे, डॉ.एस.डी.चौधरी, डॉ.पराग पाटील, डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्यासह आदी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.