Home राजकीय रस्ता दुरूस्तीसाठी उद्या प्रहार जनशक्तीचे आंदोलन

रस्ता दुरूस्तीसाठी उद्या प्रहार जनशक्तीचे आंदोलन

0
65

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील केर्‍हाळा ते मंगरूळ रस्त्याच्या दुरूस्तीसाठी उद्या प्रहार जनशक्ती पक्ष आंदोलन करणार आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील केर्‍हाळा ते मंगरूळ या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे केर्‍हाळा येथील दीपक पाटील यांनी स्वातंत्र्यदिनापासून उपोषण सुरू केले आहे. मात्र अद्यापही याची दखल घेण्यात न आल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे हे आंदोलन भोकरी पुलावर करण्यात येणार असून पक्षाचे पदाधिकारी सुरेश पाटील, राजेंद्र महाजन, गणेश बोरसे आदींच्या उपस्थितीत याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.


Protected Content

Play sound