रावेर प्रतिनिधी । गेल्या वर्षी शंभर टक्के वसूली करणारे रावेर महसूल विभागाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यंदा वसूलीचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करतांना प्रचंड ढिलाई दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत फक्त ५८ टक्केच शासनाचा महसूल वसूल झाला आहे. परंतू पुढील आठ दिवसात एक कोटी मिळण्याची अपेक्षा रावेर महसूल प्रशासनाला आहे.
कोरोनाचा पादुर्भावात देखिल शासन महसूल वसूलीकडे गांभीर्याने लक्ष घातले आहे.खास करून कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रावेर महसूला दिलेले दहा कोटीचे उद्दीष्ट जास्त होतात म्हणून १ कोटी २५ लाख कमी करून ८ कोटी ७५ लाखाचे महसूल उद्दीष्ट दिले होते.मात्र हे देखील वसूली करतांना ढिलाई दिसत आहे. मार्च एंन्ड दहा दिवसावर असतांना आता पर्यंत ५ कोटी १३ लाख ५८ : ७१ टक्केच वसूल झाला आहे. पुढील आठ दिवसात एक कोटी वसूल होण्याची अपेक्षा रावेर महसूल विभागाला आहे.