रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू या विराजमान झाल्याचा आनंद उत्सव आज रावेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप कार्यालयासमोर आदिवासी बांधवांसोबत फटाके फोडून व मिठाई वाटप करण्यात आली.
याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी भाजपा किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर तालुका सरचिटणीस सी एस पाटील, दिलीप पाटील, नथ्थु धांडे, कैलास कैलास, पारधी, परमेश्वर सोनार, साजन पाटील, रवींद्र महाले, राहुल सोनार, सिकंद तडवी, असलम तडवी, सुधाकर पारधी, अलाउद्दीन तडवी, मलखा पवार, सर्वान राजन, अमीर सुभान, मोहम्मद रमजान, अकबर नामदार, नसीर वजीर, शेख मोहरबा, रवींद्र पवार ,सुनील राठोड आदिवासी बांधव व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.