जळगाव । कोरोनाच्या लढ्यात शिक्षक देखील अतिशय मोलाची कामगिरी बजावत आहेत. याच प्रकारे कोरोनाशी थेट दोन हात करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारे औरंगाबाद येथील शिक्षक संजयकुमार जयस्वाल यांचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे दिसून आले आहे.
श्री. संजयकुमार जयस्वाल
शिक्षक
औरंगाबाद
सलाम त्यांच्या योगदानाला!
श्री. एस. डी. जयस्वाल सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातील व्होकेशनल एज्युकेशन च्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी चे पूर्ण वेळ शिक्षक. कोरोना महामारी आल्यापासून कॉलेज बंद असल्यामुळे मुलांचे शिक्षण-प्रशिक्षण बंद राहू नये म्हणून स्वतःच्या युट्युब चॅनेलद्वारे प्रशिक्षण देण्याचे आपले कर्तव्य सुरूच. त्यातच महापालिकेतून आदेश आलेत Covid-19 सर्वेक्षणासाठी नेमणूक झाल्याचे.
आदेशामुळे सुरुवातीला भीती वाटली, पूर्ण परिवार टेन्शनमध्ये, पण ही “एक देशसेवेची संधी आहे, आपले योगदान देण्याची संधी आहे” असे मनावर बिंबवून त्यांनी अधिकाऱ्यांना भेटून आवश्यक ती किट घेऊन काम सुरू केले.
अशातच सर्वेक्षणासाठी परिसर मिळाला वय ५० वर्षापेक्षा जास्त असलेल्या वरिष्ठ नागरिकांची संख्या बऱ्यापैकी असलेला. कोरोना विषाणूचा धोका या वयोगटाला सर्वाधिक. त्यामुळे “आपण आपल्या परिवाराच्या जीवाशी तर खेळत नाही ना” अस एक विचार आला पण ‘आपण कुणासाठी काहीतरी करतोय, यामुळे कुणाला काहीतरी मदत होऊ शकते’ ही भावना ठेवून आपले काम सुरूच ठेवले.
सर्वेक्षणाच्या तीन फेऱ्या केल्या. त्यात पहिल्या व दुसऱ्या फेरीला सर्व नागरिकांनी सहकार्य केले परंतु तिसऱ्या फेरीला काही परिवारांनी तपासणीसाठी नकार दिला. तेव्हा त्यांची समजूत घालून, बोलून ती जबाबदारीही त्यांनी मोठ्या हिमतीने पार पाडली.
“प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्यूअर” या थीमसोबत कॉलनीकरीता काही करण्यासाठी तेथील ऍक्टिव्ह लोकांशी त्यांनी चर्चा केली. त्या कॉलनीत अँटीबॉडी टेस्ट करण्याचा तसेच कोरोनाला हरवून घरी आलेल्या व्यक्तींचे मनोगत, कोरोनाला त्यांनी कसे हरवले या सर्व गोष्टी त्यांच्या युट्युब चॅनेलद्वारे लोकांपर्यंत पोहचविण्याचा, जनजागृती करण्या ची त्यांची धडपड सुरू आहे.
सलाम संजयकुमार जयस्वाल व त्यांच्यासारख्या सर्व शिक्षकांना जे युवकांचे भविष्य घडविण्याबरोबरच आलेल्या आपत्ती विरुद्धच्या लढ्यात आपले योगदान देत आहेत.
( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )
अधिक माहितीसाठी
फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers