हार्ट ऑफ गोल्ड : रूग्णांच्या सेवेत कार्यरत आहे गर्भवती महिला डॉक्टर !

जळगाव प्रतिनिधी । स्वत: गर्भवती असून घरी लहान बाळ असतांनाही एक महिला डॉक्टर ही कोरोना रूग्णांची अहोरात्र कार्यरत असल्याचे आपल्याला खरे वाटणार नाही. तथापि, डॉ. वनश्री पालवे या याच प्रकारे रूग्णांची सेवा करत असून आज त्यांच्या कार्याबाबत आपल्याला माहिती देत आहोत.

स्वतः गर्भवती, घरी लहान बाळ तरीही रोज १५०-२०० कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेत कार्यरत कर्तव्यनिष्ठ महिला डॉक्टर म्हणजेच….

सौ. वनश्री पालवे
वैद्यकीय अधिकारी
ग्रामीण रुग्णालय, म्हसावद ता. एरंडोल

सलाम तिच्या हिंमतीला … सौ. वनश्री पालवे आज स्वतः गर्भवती असून ८ महिन्याचं बाळ पोटात घेऊन त्या कोरोना रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे. घरी तीन वर्षाची मुलगी आहे. त्यात डॉक्टरांनी हाय रिस्क सांगितली आहे. असे असून देखील कर्तव्यापोटी त्या आज दररोज सुमारे १५०-२०० संशयित कोरोना रुग्णांची तपासणी व त्यावर न घाबरता, न थकता रुग्णालयात उपचार करीत आहेत.

त्यांचे पती पंकज पालवे देखील डॉक्टर असून ते सुद्धा जळगावात सुप्रीम कॉलनी येथे गरीब रुग्णांसाठी कोरोना काळात अखंडपणे आपली प्रॅक्टिस सुरु ठेवली आहे.

सलाम अश्या सर्व वैद्यकीय सेवेत कार्यरत कोरोना योद्धारुपी डॉक्टर्स ना जे स्वतःच्या कुटुंबाची , जीवाची पर्वा न करता समाजासाठी, कर्तव्यासाठी, मानवतेसाठी झटताय.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करा.

Facebook : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

Instagram : https://www.instagram.com/rcb_jewellers

अशाच प्रकारच्या कोरोना योध्द्यांची माहिती आपल्याला रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेत देण्यात येणार आहे. ही मालिका आपण दररोज लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून सादर करण्यात येणार आहे.

ratanlal c. bafna jewellers, ratanlal c. bafna jewellers jalgaon, r. c. bafna jalgaon, r c bafna jalgaon gold rate today, gold price jalgaon, gold price today jalgaon, gold rate today jalgaon, gold rate today in jalgaon

Protected Content