हार्ट ऑफ गोल्ड : ‘मिशन झीरो औरंगाबाद-एक ऐतिहासिक उपक्रम’

जळगाव । कोरोनाच्या प्रतिकारासाठी विविध सामाजिक संस्थांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे. यात भारतीय जैन संघटनेतर्फे औरंगाबाद शहरात ‘मिशन झीरो औरंगाबाद-एक ऐतिहासीक उपक्रम’ या नावाने अतिशय स्तुत्य अशी मोहिम राबविण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

भारतीय जैन संघटना ,
औरंगाबाद

भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलालजी मुथा यांनी आपल्या मार्गदर्शक तत्व व संकल्पनेद्वारे औरंगाबाद शहर व जिल्ह्यात जागतिक कोरोना साथीच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर सुरु झाला मिशन झीरो औरंगाबाद प्रकल्प.

या मोहिमेअंतर्गत ३० डिसेन्सरी व्हॅन च्या माध्यमातून २९ दिवसात ३५००० नागरिकांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या ज्यात आतापर्यंत ११०० पेशंट पॉझिटीव्ह आले. मिशन झिरो मधील या कोविड पॉझिटिव्हच्या तपासणीने पुढील हजारो लोकांना कोरोना संसर्ग होण्यापासून वाचविण्याचे मोठे काम केले. मिशन झीरोमध्ये दररोज २० ते २५ ठिकाणी अँटीजेन टेस्ट ची शिबिरे आयोजित केली जातात. भारतीय जैन संघटनेचे स्वयंसेवक पूर्ण परिसरात फिरून लोकांमध्ये असलेली कोरोना ची भीती दूर करण्याचे काम करतात. आपल्या मोबाईल डिस्पेन्सरी मधील ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून लोकांना कोविड टेस्ट करण्यासाठी बोलविण्यात येते.

या प्रकल्पातीलच एक आहे झीरो सर्वेक्षण – अँटी बॉडी टेस्टिंग. मनपा औरंगाबाद आणि भारतीय जैन संघटनेने १० ते १६ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद शहरातील ११५ वॉर्डांमधून ४००० नागरिकांची अँटीबॉडी टेस्ट केली. त्यातून हे समजले कि शहरातील कोणत्या भागातील नागरिकांच्या प्रतिकारक्षमतेमुळे कोणत्या नागरिकांना कोरोना होऊन गेला, हे त्यांना कळलेही नाही आणि त्यांच्यामुळे कोणाला त्रासही झाला नाही. या टेस्टमध्ये पॉझिटीव्ह येण्याला विशेष महत्व म्हटले जाते आणि ही एकच टेस्ट अशी आहे ज्यात पॉझिटीव्ह आल्यावर आनंद होतो. आगामी काळात झिरो सर्वेक्षणात मिशन झिरो औरंगाबादसाठी ही मोठी कामगिरी ठरणार आहे. या मोहिमेमध्ये, जैन संघटनेकडून २० मोबाइल डेन्सिटरी वाहने व स्वयंसेवक देण्यात आले ज्यामुळे मनपा च्या टीम प्रत्येक वार्डात पोहचू शकल्या.

या मोहीमेअंतर्गतच प्लाझ्मा दाता हा उपक्रम राबविण्याचा संघटनेचा मानस आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी भारतीय जैन संघटनेचा हा उपक्रम आगामी काळात आपली आवश्यकता दाखवून देईल. कोविड पासून पूर्णपणे तंदूरुस्त झालेल्या ५००० कोविडवीरांच्या प्लाझ्मा डोनेशनच्या संमतीचे पत्र भरून सरकारला देण्याची संकल्पना बनविण्यात आली.

सलाम मिशनचे झिरो औरंगाबाद चे प्रमुख मार्गदर्शक श्री. गौतमजी संचेती, यांच्या नेतृत्वात राज्य कार्यकारी सदस्य श्री. प्रवीणजी पारीख, श्री पारसजी बागरेचा, विभागीय अध्यक्ष श्री पारसजी चोरडिया, सचिव श्री. राहुलजी झाबड, जिल्हाध्यक्ष श्री. किशोरजी लालवाणी सचिव श्री. अनिलजी संचेती प्रकल्प नियोजन प्रमुख प्रकाश कोचेटा आणि श्री. अमितजी काला आणि त्यांच्यासारख्या सर्व समाजबांधवांना जे औरंगाबाद शहरासाठी हा ऐतिहासिक उपक्रम राबवित आहेत.

( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )

अधिक माहितीसाठी

फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers

Protected Content