जळगाव । कोरोनाच्या उपचारासाठी अगदी महानगरे व मोठ्या शहरांमध्येही अडचणी येत असतांना दुर्गम आदिवासी पाड्यांवर मैलोगणती पायपीट करून रूग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणार्या यावलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी जिथे बस वाहने पोहचत नाही,अशा ठिकाणी ५-६ किमी पायी चालून कोरोना रुग्ण शोधून, त्यावर उपचार करणारी वीर योद्धा.
डॉ. मनीषा महाजन
वैद्यकीय अधिकारी
ग्रामीण रुग्णालय, यावल
सलाम नारीशक्ती ला…
डॉ. मनीषा महाजन आज लहान बाळाला घरी एकटे सोडून सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेलं गाव पाड्यात जाऊन कोरोना रुग्ण शोधणे व त्यावर उपचार करण्याचे कठीण कार्य पूर्णत्वास नेत आहेत. लहान लहान गावे जेथे बस – वाहने जात नाहीत, वैद्यकीय सेवा पोहचत नाहीत अश्या दुर्गम ठिकाणी ५-६ किमी पायी चालून जाणे व जीवाची पर्वा न करता सेवा बजावणे हे खरंच साहसाचं काम आहे . फक्त कर्तव्याचंच
नव्हे तर मानवतेचं कार्य आहे.
ग्रामीण भागात सेवा देणार्या अश्या सर्व हार्ट ऑफ गोल्ड असणार्या वैद्यकीय अधिकार्यांना आमच्यातर्फे सन्मानपूर्वक सलाम!
( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )
अधिक माहितीसाठी
फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers