जळगाव प्रतिनिधी । कोरोना हा शब्द जरी उच्चारला तरी दचकणार्या समाजाचे आपण घटक आहोत. यामुळे अतिशय भयंकर कालखंडात कोविड मृतांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार करणारे जळगाव येथील बिर्हाडे बंधू हे नक्कीच कौतुकास पात्र आहेत.
श्री. काशिनाथ बिर्हाडे , पंढरीनाथ बिर्हाडे
कर्मचारी नेरी नाका स्मशान भूमी,
जळगाव
सलाम त्यांच्या हिमतीला !
घरी हलाखीची परिस्तिती, त्यात आलेला कोरोना,त्यामुळे निर्माण झाली उदरनिर्वाहाची चिंता. म्हणून कोरोना मृतांच्या अंत्यसंस्काराचे सोपवलेले काम ही कर्तव्यभावनेने करताहेत बिर्हाडे बंधू.
मागील काही वर्षांपासून काशिनाथ बिर्हाडे व त्यांचे बंधू नेरी नका स्मशानभूमी जळगाव येथे अंत्यसंस्कारासाठी मदत तसेच तेथील साफ सफाईचे काम करीत आहेत. त्यातच कोरोनामुळे नेरी नाका स्मशानभूमी कोरोना डेडिकेटेड स्मशानभूमी घोषित झाली.
कोरोना मृतांसोबत त्यांच्या परिवारातील लोकही येत नाहीत. त्यामुळे त्यांचेवर अंत्यसंस्कार ही तुम्हाला करावे लागतील, असे महापालिकेकडून त्यांना सांगण्यात आले. जेव्हा त्यांनी हे काम करण्याबद्दल घरी सांगितले तेव्हा घरच्यांनी जीव धोक्यात घालू नका, आम्ही अडचण सहन करू असे सांगितले. तसेच इतरांकडून ही या जीवघेण्या आजाराची माहिती त्यांना मिळत होतीच. तरी ते माझे कामचं माझा धर्म आहे असे म्हणून त्यांनी त्या कामास होकार दिला. अजूनही ते काम ते करत आहेत. नंतर हळूहळू त्यांच्या परिवाराला ही आता त्याची सवय झाली आहे.
कोरोना मृताचा देह घेऊन अॅम्ब्युलन्स आली की, ती बॉडी स्ट्रेचर सहित काळजीपूर्वक उतरविणे, नंतर ती बॉडी पी.पी.ई.किट घालून तिच्यावर अंत्यसंस्कार करणे; नंतर स्वतःला सॅनिटाईज करून घरी जातांना परत सॅनिटाईज करणे. कपडे बदलविणे. घरी गेल्यावर घरच्यांच्या स्वास्थ्याच्या काळजीमुळे पुन्हा पूर्ण शरीर सॅनिटाईज करणे हा त्यांचा दिनक्रम. आतापर्यंत त्यांनी जवळपास ३०० मृतांवर अंत्यसंस्कार केलेत. २० ऑगस्ट या एकाच दिवशी त्यांनी जवळपास १८ मृतांवर अंत्यसंस्कार केलेत. यात त्यांना महानगरपालिका कर्मचारी श्री. धनराज सपकाळे यांची ही वेळोवेळी मदत होतेय.
सलाम काशिनाथ बिर्हाडे, पंढरीनाथ बिर्हाडे आणि त्यांच्यासारख्या सर्व जिगरबाजांना जे जीवांची बाजी लावून, सर्व नकारात्मक विचार बाजूला सारून त्यांना सोपवलेले काम तत्परतेने पूर्ण करत आहेत.
( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )
अधिक माहितीसाठी
फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers