जळगाव । कोविड विरूध्दच्या लढाईत अनेक जण आपल्या वैयक्तीक आयुष्यातील महत्वाच्या बाबींना बाजूला ठेवून अहोरात्र सेवा करत आहेत. यात डॉ. आयेशा महाजन यांचा लढा हा अतिशय कौतुकास्पद आणि अनेकांना प्रेरणा देणारा असाच आहे.
डॉ.आयेशा महाजन
बंगलोर
साखरपुड्याची तारीख ठरलेली, त्या कार्यक्रमाची तयारी सोडून सुरू होती कॅन्सर रुग्णांची सेवा. त्यातूनच आल्या मकोरोना पॉझिटिव्हफ. त्यानंतर स्वतःला केले आईसोलेट व साखरपुडा ही केला पोस्टपोन…. बरे होऊन पुन्हा सुरू केली रुग्णसेवा. ही कहानी आहे डॉ. आयेशा महाजन यांची. ज्या लवकरच लग्नानंतर जळगावकर होणार आहेत.
मूळच्या राहणार्या इंदोरच्या.मात्र P.G. (कॅन्सर स्पेशल) चे शिक्षण करण्यासाठी त्या बंगलोरला गेल्यात. तेथे शिक्षण सुरू असतानाच कोरोना आला.यांच्याकडून मात्र कॅन्सर पेशंटची ट्रिटमेंट सुरूच होती,ती टाळता येणेही सहज शक्य नव्हते. त्यामुळे रोज ५० – १०० कॅन्सर रुग्णांची तपासणी व उपचाराची जबाबदारी डॉ. महाजन यांच्यावर होती. ती निभावत असतांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याही पॉझिटिव्ह आल्यात.
डॉ. महाजन पॉझिटिव्ह आल्यात ७ ऑगस्टला आणि साखरपुडा होता २९ ऑगस्टला. त्यामुळे तो कार्यक्रम तर शक्य होणार नव्हताच. त्यामुळे त्यांचे आईवडील, मुलाकडचे सर्व टेन्शनमध्ये आलेत. सर्वांची मानसिकता खराब झाली. आम्ही तुझ्याकडे येतो तू काळजी घेऊ नको असे परिवारातील लोक म्हणत होते. तुम्ही येऊ नका, विनाकारण संपर्कात आल्याने तुम्हास याची लागण होईल. मी आईसोलेशनमध्ये आहे व माझ्यासोबत आमचे डॉक्टरही मदतीला आहेत जे एका कॉलवर येऊ शकतील असे कुटुंबाला सांगून त्यांनी सर्वांना घरीच थांबविले.
घडलेल्या या प्रकारामुळे त्या खचल्या नाहीत,यावर त्यांचे म्हणणे आहे मला स्वतःपेक्षा माझ्या रुग्णांची जास्त चिंता होती, कारण आधीच त्या रुग्णांची मइम्युनियटीफ आधीच कमी असते. माझ्यामुळे त्यांना काही त्रास तर झाला नसेल ही काळजी नेहमी वाटत होती.एकट्याने आईसोलेशनमध्ये राहणेही मानसिक खच्चीकरण करणारे होते.पण त्यावर दुसरा पर्याय ही नव्हता.यातून बाहेर निघून सर्व झालेल्या प्रकारातून सावरत त्या पुन्हा रुग्णांना सेवा देत आहेत.
सलाम डॉ. आयेशा महाजन व त्यांच्यासारख्या सर्व डॉक्टर्सना जे वैयक्तिक जीवनापेक्षा रुग्णांची सेवा करण्यास प्राधान्य देतात.
( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )
अधिक माहितीसाठी
फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers